PM स्वानिधी योजना : ४८,००० पथ विक्रेत्यांसाठी शासनाने मंजूर केले कर्ज, ‘या’ लिंकवर जाऊन करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील विविध राज्यातील जवळपास १,५४,००० पथ विक्रेत्यांनी पंतप्रधान स्वानिधी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला होता त्यातील ४८,००० लोकांचे कर्ज मंजूर झाले आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना ही कोरोना विषाणूमुळे रोजगार बुडालेल्या विक्रत्यांसाठी सरकारने भांडवल देण्यासाठी १ जून २०२० ला ही योजना सुरु केली होती. शहरी आणि ग्रामीण भागातील ५० लाखाच्या आसपास पथ विक्रेत्यांना कर्ज देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

या सरकारी योजनेंतर्गत विक्रेते १०,०००रुपये कर्ज घेऊ शकतात. जी रक्कम दरमहिन्याला हप्त्याने परत करता येते. जर लवकर कर्ज परतफेड केली तर कर्जदाराच्या खात्यावर ७% व्याज थेट सबसिडी म्हणून दिले जाते. आणि कोणताच दंडही आकारला जाणार नाही. ही योजना डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देते. या योजनेसाठी सरकारने मोबाईल ऍप देखील लाँच केले आहे. या ऍपद्वारे अगदी सोप्या पद्धतीने विक्रेते कर्जासाठी अर्ज करू शकतात. २९ जून ला गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने एक वेबसाईटही लॉन्च केली आहे.

http://pmsvanidhi.mohua.gov.in/ApplyLoan/ApplyLoan या वेबसाईटवर थेट अर्ज करता येऊ शकतो. तसेच  http://pmsvanidhi.mohua.gov.in/ या साईट वर जाऊन अप्लाय लोन वर क्लिक करून आपला मोबाईल नंबर आणि कॅप्चा ऍड करायचा. कॅटेगिरी निवडून सर्व माहिती भरून सबमिट करायचे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment