PNB आपल्याला देत आहे स्वस्त घरे आणि दुकाने खरेदी करण्याची संधी, याचा फायदा आपण कसा घेऊ शकता ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्याला ही संधी देत ​​आहे. वास्तविक, PNB रेजिडेंशियल/कमर्शियल प्रॉपर्टीजचा देशभरात ऑनलाईन मेगा ई-लिलाव (ऑक्शन) करणार आहे. 15 आणि 29 सप्टेंबर रोजी पारदर्शक पद्धतीने लिलाव घेण्यात येणार आहे. या प्रॉपर्टीच्या लिलाव प्रक्रियेत आपण कसा भाग घेऊ शकता आणि खरेदी करू शकता हे जाणून घेउयात …

या कारणांमुळे या प्रॉपर्टीचा लिलाव होत आहे
बँकेच्या संबंधित शाखांनी याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या आहेत आणि PNB ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही माहिती दिली आहे. हा ई-लिलाव अशा प्रॉपर्टीजचा होणार आहे जे बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरले. आणि त्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यासाठी आता पीएनबी या मालमत्तांचा लिलाव करणार आहे.

येथे रजिस्ट्रेशन केले जाईल
बँकेच्या म्हणण्यानुसार, जे या लिलावात सहभागी होऊ इच्छित आहे ते e-Bkray (e-B-क्रय) पोर्टल https://ibapi.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात; आपण नियम आणि अटी, बिड साइज, प्रॉपर्टीची व्हॅल्यू आणि लोकेशन याविषयीची माहिती मिळवू शकता. या लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला हे नियम पाळावे लागतील ..

बिडर / खरेदीदाराची रजिस्ट्रेशन
निविदाकाराला या ई-लिलावाच्या प्लॅटफॉर्मवर आपला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीसह रजिस्ट्रेशन करावे लागेल. निविदाकाराला आवश्यक ते सर्व KYC डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील. हे KYC डॉक्युमेंट ई-ऑक्शन सर्व्हिस प्रोवायडर द्वारा वेरिफाय केले जाईल. याला 2 कामकाजी दिवस लागू शकतात.

EMD फंडाचे बिडर ग्लोबल EMD वॉलेटमध्ये ट्रांसफर
ई-लिलाव नोटीसमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट मालमत्तेसाठी EMD (अर्नेस्ट मनी डिपॉझिट) निधी NEFT/ट्रांसफरही मार्गदर्शकतत्त्वे पूर्ण केल्यानंतरच इच्छुक रजिस्टर्ड बिडर्स या ई-लिलावाच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली लावू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”