नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा घेऊन आली आहे. या सुविधेमध्ये आपण आपली सर्व कामे केवळ SMS द्वारे करू शकता. मग आपल्याला आपल्या खात्यातील शिल्लक तपासायची असेल की फंड ट्रान्सफर करायचा असेल. या सर्व कामांसाठी आपल्याला घराबाहेर जाण्याची देखील आवश्यकता नाही. यासाठी आपण फक्त आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून बँकेला SMS पाठवू शकता. यानंतर, आपल्याला सर्व डिटेल्स मिळतील.
नंबर खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे
या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असणे सर्वात महत्वाचे आहे. जर आपला नंबर खात्याशी लिंक नसेल तर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. PNB SMS Banking सेवेद्वारे एका दिवसात फक्त 5000 रुपयेच ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
या सुविधेमध्ये मिळत आहेत अनेक सेवा
PNB SMS Banking अंतर्गत आपण केवळ SMS द्वारे बँकिंगचे काम करू शकता. या सुविधेअंतर्गत कोणत्या सेवा दिल्या जात आहेत याविषयीच्या माहितीसाठी आपल्याला “PNB PROD” असे लिहून 5607040 वर SMS पाठवावा लागेल. SMS येताच आपल्याला सेवांची संपूर्ण लिस्ट पाठविली जाईल.
प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवू शकते
बँकेच्या या सुविधेअंतर्गत तुम्हाला सर्व संदेशांची माहिती SMS द्वारे मिळेल. SMS Banking साठी तुम्हाला 5607040 या क्रमांकावर बँकेने सूचित केलेल्या स्वरुपात SMS पाठवावा लागेल.
For Balance Inquiry
BAL /space/ 16 digit Account Number
e.g: BAL 015300XXXXXXXXXX
मिनी स्टेटमेंटच्या चौकशीसाठी
MINSTMT /space/ 16 digit Account Number
e.g. MINSTMT 015300XXXXXXXXXX
फंड ट्रांसफर करण्यासाठी
SLFTRF /space/ FROM A/C /space/ TO A/C /space/ AMOUNT
e.g. SLFTRF 015300YYYYYYYYYY 015300XXXXXXXXXX 100
चेक स्टेटसच्या माहितीसाठी
CHQINQ /space/ CHEQUE NUMBER /space/ 16 digit Account Number
e.g. CHQINQ 123456 015300XXXXXXXXXX
चेक पेमेंट रोथांबवण्यासाठी
STPCHQ /space/ CHEQUE NO. /space/ 16 digit Account Number
e.g. STPCHQ 123456 015300XXXXXXXXXX
रजिस्टर्ड ग्राहक वापरू शकतात
बँकेची ही सुविधा रजिस्टर्ड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. आपण या सुविधेद्वारे आपली खाती चोवीस तासात कधीही ट्रॅक करू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.