हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना बँकेने सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा विशिष्ट मुदतीच्या FD वर आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व मुदतीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
PNB च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, बँकेकडून 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर 0.30 टक्क्यांनी वाढवले आहेत. 13 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत.
व्याजदर 6.15 टक्क्यांवरून 6.45% केला
ज्येष्ठ नागरिकांसाठी PNB कडून 5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.15% वरून 6.45% पर्यंत वाढवला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिकांसाठीचे नवीन व्याजदर
PNB च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आता 60 वर्षे आणि 80 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर, 5 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी लागू असलेल्या दरांपेक्षा 0.50 टक्के जास्त आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी लागू असलेल्या दरांपेक्षा 0.80 टक्के जास्त व्याजदर दिला जाईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html
हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी
Salary Slip म्हणजे काय ??? त्यामध्ये कोण-कोणत्या बाबींचा समावेश असतो हे समजून घ्या
Telegram चे ‘हे’ 5 फीचर्स आहेत खूप उपयोगी, त्याविषयी जाणून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन