नवी दिल्ली । देशातील दुसर्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने व्यापाऱ्यांसाठी एक खास कर्ज योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव पीएनबी जीएसटी एक्सप्रेस लोन असे आहे. या योजनेद्वारे आता व्यापाऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय अगदी सहजपणे कर्ज घेता येणार आहे. पीएनबी जीएसटी एक्सप्रेस लोनमध्ये आपण कर्ज कसे घेऊ शकता आणि आपल्याला जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते ते जाणून घेउयात.
10 लाख ते 1 कोटी रुपये कर्ज दिले जाईल
पीएनबी जीएसटी एक्सप्रेस लोन योजनेअंतर्गत कोणताही व्यवसाय वाढवण्यासाठी कोणताही व्यावसायिक पंजाब नॅशनल बँकेतून दहा लाख रुपयांपासून ते एक कोटीपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. या कर्जाचा कालावधी एक वर्ष असेल. तो वाढवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
लोनसाठी सिक्योरिटी काय असेल ?
जर तुम्हाला पीएनबी जीएसटी एक्सप्रेस मधून कर्ज घ्यायचे असेल तर यासाठी आपण बँकेत दोन प्रकारची सिक्योरिटी ठेवू शकता. यामधील पहिली प्रायमरी सिक्योरिटी ही आहे, ज्यामध्ये युनिटची संपूर्ण चालू मालमत्ता आणि गैर-वर्तमान मालमत्तांसह आपण बँकेतून फायनान्स मिळवू शकता. याशिवाय, कोलॅटरल सिक्योरिटी म्हणून आपण रिअल इस्टेटला मॉर्गेज म्हणून ठेवू शकता. यासाठी, मालमत्तेचे मूल्य एकूण जोखमीसारखे असले पाहिजे. यासह NSC, किसान विकास पत्र, एफडी आणि सीडीआरवरही फायनान्स मिळू शकेल.
पीएनबी जीएसटी एक्सप्रेस कर्जासाठीची पात्रता
पीएनबी बँकेच्या म्हणण्यानुसार केवळ त्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जे त्यांचा व्यवसाय कायदेशीररित्या करतात. यासह, अर्जदाराची जीएसटी नोंदणी आवश्यक आहे आणि त्याने किमान 6 महिन्यांचा जीएसटी रिटर्न भरलेला असला पाहिजे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.