रंगपंचमीनिमित्त बेकायदेशीर बैलगाड्या शर्यतीवर पोलिसांची कारवाई

किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

किल्लेमचिंद्रगड (जि. सांगली) येथे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सय्यदनगरमध्ये रंगपंचमी निमित्त बेकायदेशीर बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या बेकायदेशीर शर्यतीवर कराड तालुका पोलिसांनी कारवाई केली असून त्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी बेकायदेशीर बैलगाडीचे आयोजन केल्याची माहीती डीवायएसपी रणजित पाटील यांना मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू डांगे व पोलीस हवालदार सपकाळ, एसआय जाधव व एक्के यांनी ही कारवाई केली.

शर्यंतीच्या ठिकाणी पोलीस पोहचताच शर्यंतीचे आयोजन करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. घटनास्थळी दोन छकडे व इतर साहित्य मिळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. तसेच दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किल्ले मचिंद्रगड हा परिसर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने गुन्हा इस्लापूर पोलिसांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील  तपास सांगली पोलीस करत आहेत असल्याची माहिती कराड ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like