जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला आहे.

अशी घडली घटना
दिल्लीतील द्वारका परिसरात एका घरात राहणाऱ्या पती-पत्नीने शेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेकडून दीड लाख रुपये उधार घेतले होते. यानंतर त्यांनी कबुल केलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने या वृद्ध महिलेने पैशांसाठी तगादा लावला होता. या सततच्या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी या दोन्ही पती पत्नीने त्या महिलेचा खून करण्याची योजना आखली. हि वृद्ध महिला घरी एकटी असताना हे दोघे घरी घुसले आणि तिची दोरीने गळा आवळून हत्या केली.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
या जोडप्याने खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी बाजारातून तीन मोठ्या बॅगा विकत आणल्या. घरातील भाजी चिरण्याच्या सुरीने मृतदेहाचे बारीक तुकडे करून ते तीन वेगवेगळ्या बँगांमध्ये भरले आणि नाल्यात फेकून दिले. यानांतर या जोडप्याने दिल्ली सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मृत महिलेच्या नातेवाईकांनी महिला गायब असल्याची तक्रार केली, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

असा लागला खुनाचा शोध
महिलेच्या शेजारील फ्लॅट रिकामा असल्याने पोलिसांना संशय आला. यानंतर त्यांनी महिलेच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा शेजारील पती पत्नी बॅगा भरून घेऊन जात असताना दिसले. यानंतर पोलिसांना या पती पत्नींवर संशय आला आणि त्यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे पती-पत्नीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशातील बरेलीत दाखवले. यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.