RSS कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

RSS
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) ची 6 कार्यालये बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे सदर आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी तामिळनाडून अटक केली आहे.

राज मोहम्मद याने अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारींना व्हॉटसअॅपवर मेसेज करत लखनौ येथील RSS कार्यालय बॉम्ब ने उडवण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ चौकशी करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

काय आहे प्रकरण-

Rss कार्यालय बॉम्ब ने उडवण्याची धमकी एका व्यक्तीने मोबाईल नंबर वरून दिली होती. लखनऊ मधील अलीगंज येथील सरस्वती मंदिर शाळेतील RSS कार्यालय तसेच कर्नाटक येथेही 5 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्यात येईल अस त्या धमकीच्या मेसेज मध्ये म्हंटल होत. या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाईला सुरुवात केली होती.