बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये एका विधवा शिक्षिकेने मोठ्या हुशारीने एका तरुणाशी ओळख वाढवून त्या तरुणाला ब्लॅकमेल करून आत्महत्येसाठी भाग पाडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला जलंब पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रभूदास बोळे असे आहे. तो खामगाव तालुक्यातील पहुरजीरा येथील रहिवाशी होता. सुटाळा येथे आपल्या दोन मुलींसह राहत असलेल्या एका विधवा शिक्षिकेने प्रभूदास यांच्यासोबत ओळख केली. यानंतर हि ओळख एवढी वाढली कि ती बोळे यांना व्हिडिओ कॉल करायची. तसेच ती प्रभूदास याच्यासोबत ऑनलाइन चॅटिंगदेखील करत होती. तसेच ती घरीदेखील येत होती. यानंतर काही दिवसांनी या शिक्षिकेने बोळे यांच्याकडं फ्लॅट घेण्यासाठी पैशाची मागणी केली. यानंतर तिने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या सगळ्यामुळे प्रभूदास खूप वैतागला होता.
अखेर त्याने या सगळ्याला वैतागून १६ मे रोजी रात्री विष पिऊन आत्महत्या केली आहे. प्रभुदास याने आत्महत्या केल्यानंतर पत्नी वर्षा हिने आपल्या पतीचा मोबाईल चेक केला असता तेव्हा तिला आरोपी शिक्षिकेने केलेले मेसेज तिला दिसले. यामध्ये ‘माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. मी विचारायला येईन. फोन स्वीच ऑफ करून काहीही होणार नाही. माझ्यात बदल होणार नाही,’ असे मॅसेज होते. यानंतर वर्षा बोळे यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार केली. ही शिक्षिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आत्महत्या करत आहे, असा मेसेज आत्महत्येपूर्वी बोळे यांनी मला पाठवला होता, असेदेखील वर्षा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता हि आरोपी शिक्षिका पैशासाठी तगादा लावत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी त्या आरोपी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.