Tuesday, January 31, 2023

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं होत. अखेर त्या दगडफेक करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

अमित सुरवसे असे पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या युवकाचं नाव आहे. अमित सुरवसे याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेले दोन दिवस अमित फरार होता. मात्र, आज अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -

अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याबाबत त्याच्याकडे पोलीस चौकशी करत आहेत. तसेच त्याने दगडफेकी सारखे पाऊल कुणाच्या सांगण्यावरून उचलले आहे का, याचा देखील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली.

पडळकरांचा राष्ट्रवादीवर आरोप

दरम्यान या हल्ल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले होते. पडळकरांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर ट्विट करत म्हंटल होत की हा प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांनी बहुजनांचा आवाज दबणार नाही. तसेच हाच का तुमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार असा सवाल देखील पडळकरांनी केला होता.