हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जगभरात प्रशासन सर्व गोष्टींची खबरदारी घेत आहेत. नागरिकांसाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक कऱण्यात आले आहेत. जरी संचारबंदी शिथिल केली असली तरी काही नियम काटेकोरपणे पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी नागरिक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अनेकदा पोलिसांना कठोर कारवाई करावी लागते. मेक्सिको मध्ये एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नव्हता म्हणून पोलिसांनी त्याला मारहाण केली या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मेक्सिको मधील गुआदालाजाराया शहरात ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाणीत मृत झालेल्या व्यक्तीचे नावगियोवन्न लोपेझ आहे त्याचे वय ३० वर्षे होते. डी लॉस मेमब्रिलोस शहरात नगरपालिकेत पोलिसांनी त्याला मास्क न घातल्यामुळे ताब्यात घेतले होते. या व्यक्तीला मारहाण सुरु असताना नागरिकांनी त्याला सोडण्यासाठी पोलिसांना विनंती केली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. या घटनेनंतर तेथील नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले. त्यांनी पोलिसांच्या कारला आग लावली.
लोपेझ ने मास्क घालायला नाही म्हंटले म्हणून पोलिसांनी त्याला रायफल ने मारहाण केली. एका प्रत्यक्षदर्शीने तसा आरोप केला आहे. त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. बेदम मारहाणीत त्याच्या डोक्यावर तीव्र आघात झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. स्थानिकांनी यानंतर पोलिसांच्या कृत्याविरोधात आंदोलन केले. या दरम्यान, पोलीस आणि नागरिकांमध्ये थोडी झटापट ही झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारला आग लावली. लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.