हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर आता राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या वर कलम 116, 153 (A), 117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . पोलिसांनी राज ठाकरेंना अति शर्ती घालून सभेसाठी परवानगी दिली होती. त्यातील 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे यांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचा अभ्यास पोलिसांनी केला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
A case registered in Aurangabad against MNS chief Raj Thackeray and organisers of a public rally where Thackeray delivered a speech on May 1st. Police registered the case after seeing the videos of his public rally.
(File photo) pic.twitter.com/4wa9GAPHg3
— ANI (@ANI) May 3, 2022
राज ठाकरेंच्या सभेवरून आजच कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली होती. तसेच पोलिसांनी यापूर्वीच औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनाही नोटीस पाठवली आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहे.
ब्रेकिंग बातम्यांसाठी हॅलो महाराष्ट्राचा Whatsapp ग्रुप जॉईन करा (Click Here)