हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 19 बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी काल एक ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. 2022 वर्षातील शेवटच्या दिवशी 5 नेत्यांची नावं घेत सोमय्यांनी नव्या लढाईची घोषणा केली. काल इशारा दिल्यानंतर सोमय्या आज थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत त्यांनी रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे
रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे. म्हणूनच आम्ही तक्रार करण्याचा निर्णय घेतला सल्याचे यावेळी सोमय्या यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले.