Sunday, May 28, 2023

RSS संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी; पोलिस यंत्रणा अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वत्र नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी केली जात आहे. काही तासात नवीन वर्षाला सुरुवात होणार असताना नागपूरमध्ये असलेलया आरएसएसच्या संघ मुख्यालयास उडवून देण्याची धमकी एका निवावी फोनद्वारे देण्यात आलेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यामुळे नागपूर पोलिस सतर्क झाले आहेत. मुख्यालय परिसरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

नागपुरात आज खळबळ उडवून देणारा प्रकार घडला. येथील पोलिस कंट्रोल रुमला एक निनावी फोन आला. त्यामध्ये नागपूरचं संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या फोननंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ संघ मुख्यालयाकडे धाव घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा यंत्रणेत वाढ केली.

आरएसएस संघ मुख्यालयाला सीआयएसएफची सुरक्षा आहे. त्यानंतर बाहेरचा घेरा नागपूर पोलिसांचा आहे. दरम्यान आज आलेल्या निनावी फोनमुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही संघ मुख्यालयाला उडवून देण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवले जात आहे.