हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा संघर्ष चांगलाच पेटला आहे. दरम्यान कालच्या जन आशीर्वाद यात्रेतून नारायण राणेंनी पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. या दरम्यान काल रात्री कणकवली येथे जमावबंदीचे आदेश असतानाही मंत्री नारायण राणेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित आला. यावरून आज भाजप नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे व निलेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली या ठिकाणी काळ रात्री अकरा वाजेपर्यंत कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी जमावबंदीचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह आमदार वैभव नाईक व शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रात जर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केले तर शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेने नेत्यांकडून देण्यात आला होता. या दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत मंत्री नारायण राणे यांचा स्वागत कार्यक्रम सुरु होता. या यात्रेत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लन्घन केल्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.