व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; ईडीने मागितली मालमत्तेची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीने नवाब मलिक आणि कुटुंबियांच्या मालमत्तेबाबतचा तपशील मागितला आहे. ईडीचे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या कलमांखाली मलिक यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासासाठी ही माहिती मागवली आहे.

मलिक सध्या पीएमएलए कायद्यान्वये अटकेत आहे. कुमार यांनी संयुक्त जिल्हा निबंधकांना प्रती/दस्तऐवज आणि विभागाद्वारे राखलेले इतर रेकॉर्ड प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये दस्तऐवज उक्त मालमत्तेची मालकी दर्शवते. संबंधित मालमत्ता मलिक, त्याची पत्नी मेहजबीन आणि मुलगा फराज यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने सांताक्रूझ पश्चिम येथील फ्लॅट क्रमांक 6, गुलामनबी मनील आणि फ्लॅट क्रमांक 501, वांद्रे वास्तू, वांद्रे पश्चिम येथील मलिक यांचा मुलगा फराज यांच्या मालकीचा तपशील मागवला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत.