शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला – अब्दुल सत्तार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

तसेच राज ठाकरेंना य बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल असं म्हणत त्यांनी राज याना डिवचले.शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, असेही सत्तार यावेळी म्हणाले.

नक्की काय आहे प्रकरण

राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यपालांनी पवार साहेबांशी बोलण्यास सांगितलं अस राज ठाकरे म्हणाले होते. पवारांना मी फोन करणार आहे” असं राज ठाकरे यांनी काल राज्यपालांशी भेटीनंतर माध्यमांना सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment