तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी |  कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत दिलीप ढवळे यांनी शिवसेनेला मतदान करू नका असे लिहले होते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सबंध राजकीय  वर्तुळात झाली.

आपल्या भावाच्या मृत्यूची फिर्याद पोलीस दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार आहे. आपल्या भावाच्या मृत्यूची फिर्याद चार वेळा पोलीस ठाण्यात चकरा मारून देखील घेतली जात नाही. पोलीसांनाआणि  राजकारणी लोकांना निवडणुका प्रिय आहेत. त्याकाळात सामन्याचे प्राण गेले तरी त्यांना त्याचे काहीच देणे घेणे नाही त्यामुळे आपण आपल्या भावाच्या अस्थी मातोश्री, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस स्टेशनला पाठवणार आहे असे मयत शेतकऱ्याचे बंधू राज ढवळे यांनी म्हणाले आहे.

ओमराजे निंबाळकर हे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याच्या अगोदर मला रोज होत करत होते. मात्र माझा भाऊ मयत झाला तरी त्यांनी मला साधे विचारले देखील नाही. माझा मयत भाऊ आणि मी शिवसेनेचे कार्य केले आहे. प्रत्येक निवडणुकीला शिवसेनेला मताधिक्य मिळावे म्हणून आम्ही झटलो आहे. मात्र आमची पक्षाने हेळसांड केली आहे असे राज ढोबळे म्हणाले आहेत.

Leave a Comment