कोरोना संकट काळात तरी राजकारण करणं थांबवा! ममता बॅनर्जींची मोदींना विनंती

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असंही स्पष्टपणे सांगितलं. केंद्र सरकारने कोरोनासारख्या इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं अशी मागणी पंतप्रधान मोदींसोबत आयोजित बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी बैठकीत … Read more

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; शपथपत्रात केले जाहीर

मुंबई । विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक अर्ज भरला. यावेळी निवडणूक उमदेवार म्हणून भरलेल्या शपथपत्रात प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अधिकृतपणे  जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर … Read more

एकनाथ खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत? म्हणाले…

जळगाव  । भाजपचे राज्यातील जेष्ठ आणि दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना भाजपने विधान परिषदसाठीच तिकीट नाकारलं. यामुळं भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे तीव्र नाराज असून त्यांनी भाजप सोडण्याचे आता संकेत दिले आहेत. आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे. “मला संधी … Read more

उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक जाऊन दाखल केला उमेदवारी अर्ज

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानभवन येथे विधानपरिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब जाऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी … Read more

हुश्श! महाविकास आघाडीतील तिढा सुटला; विधानपरिषद निवडणूक बिनविरोधच

मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या निर्णयावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस पक्षाने अखेर माघार घेतली असून यामुळे महाविकास आघाडीतील तिढा सुटला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज बैठक पार पडली. यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध लढण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. “विधान परिषेदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार … Read more

राज्यपाल कोश्यारींचा कारनामा; मॉडेल तरुणीला विशेष हेलिकॉप्टरने डेहरादूनला जाण्यास केली मदत?

देहरादून । कोरोना जागतिक साथीच्या आजारामुळे देशभरात सध्या लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. एकीकडे पोलिस प्रशासनातर्फे संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे, तर दुसरीकडे बरेच राजकारणी नियम मोडण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी असाच एक पराक्रम केला असल्याचे बोलले जात आहे. राज्यपालांनी जैनी उर्फ जयंती नावाच्या एका मॉडेलला महाराष्ट्रातून विशेष … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध … Read more

कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या चालतील – मणी शंकर अय्यर

राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता “स्वराज्य संस्थेतील” घटक समजले पाहिजे. पंचायतीला संविधानाच्या तीन स्तरीय हस्तांतरणीय  पद्धतीत आणण्याचा विचार केला पाहिजे. केंद्र-राज्य-पंचायत (आणि नगरपालिका).

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले … Read more