Breaking | जितेंद्र आव्हाडांच्या प्रकृतीत अचानक बिघाड, ठाण्यातील रुग्णालयात भरती

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. जितेंद्र आव्हाड यांना आज ताप आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more

घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय – राणे

रत्नागिरी प्रतिनिधी | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या देशात १८ हजार ६०१ कोरोनाबाधित आहेत तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६७६ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय असं वक्तव्य राणे यांनी केले आहे. कोरोना … Read more

पालघर प्रकरणात चंद्रकांतदादांची उडी म्हणाले,गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा द्या!

मुंबई । पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली … Read more

साधुसंतांच्या महाराष्ट्रात साधूंचीच हत्या, आरोपींना ६ महिण्यात फासावर लटकवा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, परंतु येथे साधूंचीच हत्या होत असेल तर अत्यंत चिंताजनक बाब आहे असे म्हणत आरोपींना ६ महिण्यांच्या आत फासावर लटकवा अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. पालघर मध्ये जमावाने साधूंना केलेली मारहाण, तिथे उपस्थित असलेले पोलीस आणि साधूंची झालेली हत्या हे सर्व … Read more

विषाणूविरूद्धच्या युद्धात मुस्लिमांसाठी खूपच तीव्र परिस्थिती – अपूर्वानंद 

पंजाबमध्ये मुस्लिमांना नदीच्या काठावर झोपण्यास जबरदस्ती केली जात असल्याचे अहवाल येत आहेत. पण कुणाला काहीच फरक पडत नाही. मुस्लिमांमध्ये उदासीनता, भीती तर आहेच शिवाय मुस्लिमांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

कोरोनाने जगाला पुन्हा एकदा गांधीजींच्या मार्गावर आणलंय

“प्रत्येक समस्या ही एका संधीच्या रूपात असते”, सध्याच्या साथीच्या काळातील नाट्यमय स्थितीत महात्मा गांधींनी सांगितलेल्या आधुनिकतेच्या मोहाला आपल्यापासून दूर ठेवण्याच्या (१९०९ मध्ये हिंद स्वराज जाहीरनाम्यात) गोष्टीवर प्रकाश पडतो.

मॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । गेल्या ५ वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय मॉब लिंचिंग प्रकार अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही. मी वचन देतोय. पालघर घटनेला जबाबदार जे गुन्हेगार असतील त्यांनी हत्या केली आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. … Read more

पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

Palghar Lynching Case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न झाला. जस्टीस फॉर साधुज असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडिंगला असल्याने अनेकांना पालघर मध्ये नक्की काय घडले असा प्रश्न पडला. हॅलो महाराष्ट्राच्या टीमने सदर प्रकरणाच्या काही महत्वाच्या बाजूंचा अभ्यास … Read more

गुराखी ते कॅबिनेट मंत्री! महादेव जानकरांची थक्क करणारी कहाणी

Untitled design

व्यक्तीविषेश | संपत मोरे गेल्या सालच्या मे महिन्यात मी माण तालुक्यात एका स्टोरीच्या निमित्ताने तालुक्यात फिरत असताना मी पळसावडे नावाच्या गावात गेलो, तिथं गेल्यावर गावात राष्ट्रीय समाज पक्षाचा बोर्ड दिसला. मी चौकशी केली तर मला समजलं हे गाव महादेव जानकर यांचं आहे. ‘जानकर साहेबांनी आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती. तेव्हा त्यांचं भाषण मी … Read more

पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय?

विचार तर कराल | “शासन आणि राष्ट्र या वेगवेगळ्या बाबी आहेत. राष्ट्राच्या संरक्षणार्थ जनतेने शासनाची कायम चिकित्सा केली पाहिजे. ”पण आपल्या देशात असं होतंय का हा प्रश्न आहे. आपले सरकार मार्केटिंगची तंत्रे वापरून आपल्याला गंडवत आहे का? पंतप्रधान मोदी १३० करोड भारतीयांना मानसशास्त्राचा आधार घेऊन गुलाम बनवत आहेत काय? कदाचित हो! अगदी साध्या भाषेत तीन … Read more