मागील ५ वर्ष राज्याला कर्जबाजारी करणाऱ्यांनी, कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये- नवाब मलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला 28 हजार कोटी रुपये दिले म्हणून सांगितलं. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो आणि ते बंधनकारक असते. दिलेले पैसे नवीन योजनेसाठी खर्च करत नाही. पॅकेज दिले हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्यसरकारला झालेला नाही. बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस देत आहेत. लोकं जगात, देशात, महाराष्ट्रात कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. तो त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल, असा टोलाही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

याचबरोबर आम्ही महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होऊच शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत. हे पण खरे आहे की, दिल्लीपासून महाराष्ट्रातील भाजपाचे लोक हे सरकार पडणार आहे. आम्ही सरकार बनवणार आहोत. राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे काम केलं जात आहे. परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकार एकजुटीने काम करत आहे. भाजपाने कितीही अफवा पसरवल्या तरी सरकार स्थिर राहणार आहे, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment