पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या मुद्द्यावर खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा खोटारड्यांचे सरदार आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. काँग्रेसच्या वतीने आज ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न … Read more

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही-राजू शेट्टी

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. तसेच सरकार २१ हजार कोटींची कर्जमाफी करत असल्याचा दावाही खोटा असून कर्जमाफीची यादी जाहीर केल्यास सरकार उघडे पडेल अशी टीकाही माजी खासदार राजु शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूरात बोलत होते.

शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले. अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्‍यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज … Read more

नरेंद्र मोदींच्या रुपाने ‘हिटलर’चा पुनर्जन्म – जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद, हॅलो महाराष्ट्र टीम – नरेंद्र मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म झाल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. औरंगाबाद येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात ते बोलत होते. आजही आसाममधील १४ लाख हिंदूंकडे कागदपत्रे नाहीत. आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या अनेक परिवारांकडे, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, ते लोक जुने पुरावे कोठून … Read more

केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे! खासदार धैर्यशील मानेंनी दिला कन्नडीगांना सज्जड दम

महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे अशा शब्दांत माने यांनी फेसबुक पोस्ट शेयर करत कन्नडिगांना ठणकावलं आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कारकर्त्याला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माने यांच्या जोरदार प्रतिक्रियेनंतर कर्नाटक व्याप्त सीमा भागातील वातावरण चांगलं तापणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मला पोलीस संरक्षण नको, माझे काही बरे वाईट झाले तर त्याला मीच जबाबदार; अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : सुरक्षा नसल्याने काही बरेवाईट झाले तरी ती सर्वस्वी माझी जबबादारी राहील असे म्हणत अण्णा हजारे यांनी मुखयमंत्र्यांना पत्र लिहून पोलीस संरक्षण नाकारले आहे.महिलांची सुरक्षेसंबंधीच्या विविध मागण्यांसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत मौन व्रत सुरू आहे. हे व्रत सुरू असतानाच अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सुरक्षेबाबत आपले मत सरकारला कळवले आहे. राज्य सरकारच्या सुरक्षा समितीने … Read more

भाजपमधील दुर्योधन आणि दुशासन सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंग; भाजपचे माजी नेते यशवंतराव सिन्हा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली, टीम, हॅलो महाराष्ट्र : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या तुकडे तुकडे गॅंगच्या विधानावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘दुर्योधन आणि दुशासन हे या भारतातील सर्वात धोकादायक तुकडे तुकडे गॅंगचे दोनच लोक आहेत. हे दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यांच्यापासून सावध राहा’. The most dangerous tukde tukde gang … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे?

झुंजार आणि लढवय्या नेते म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

पाकिस्तानच्या दिशेने तर आपण जात नाही ना?; लष्करप्रमुखाच्या वक्तव्यावर सिताराम येचुरी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांवर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिलेल्या विधानाचा निषेध केला आहे. सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, जनरल बिपिन रावत हे नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थ्यांच्या निदर्शनांचे चुकीचे वर्णन करीत आहेत. लष्करप्रमुखांच्या विधानावरून असे दिसून येते की नरेंद्र मोदी सरकारमध्ये घटनात्मक धोका कसा आहे, … Read more

14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा करा; खासदार मनोज तिवारी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बाल दिन साजरा करावा आणि त्यासाठी ‘बाल दिना’ची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.