राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर राष्ट्रवादी कॉंग्रस कडून कॉंग्रेसकडे घ्या असे सांगण्यासाठी मी राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हा राहुल गांधी यांनी मला पक्ष बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये जावून तिकडून तिकीट मिळवा असा सल्ला दिला तेव्हा मी थक्कच झालो असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेवून या संदर्भातील गौप्यस्फोट केला आहे.

राहुल गांधींचा थोरांतांच्या घरी केला मुक्काम ; विखेंवर कारवाइ करण्याची झाली चर्चा?

लोकसभेची हि निवडणूक विखे विरुद्ध पवार अशी करण्यात आली होती. आमच्या भाऊबंधकीला देखील या निवडणुकीने सोडले नाही. कॉंग्रेसचा प्रचार मी केला नाही कारण माझाच पक्ष माझ्या मागे उभा राहिला नाही म्हणून मी पक्षाच्या बरोबर कसे राहयचे होते. शरद पवार यांच्या मनात आमच्या घरा बद्दल  पूर्वग्रहदूषितता होती त्यामुळे त्यांनी आम्हाला अशी  वागणूक दिली असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. तसेच माझा पक्ष माझ्या मागे नसल्याने मला माझ्या मुलाच्या पाठीशी उभा राहवे लागले असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

मावळात राष्ट्रवादीची खेळी ; गिरीष बापटांची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

आपण पक्षाच्या एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असताना देखील आपला नेताच आपल्या पाठीशी नाही. याचे मला राहुल गांधींच्या सल्ल्यामुळे दु:ख झाले. तर नगर मधीलच कॉंग्रेसची काही मंडळी, नगरची जागा  कॉंग्रेसला मिळू नये म्हणून प्रयत्न करत होती असे म्हणून राधाकृष्ण पाटील यांनी राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती

विखे पाटलांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

 

Leave a Comment