मुंबई प्रतिनिधी | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस कमेटी बरकास्त करण्यात आली आहे.
बाळासाहेब थोरातांना धक्का ; त्यांनीच नेमलेल्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा
राधाकृष्ण विखे पाटील १२ एप्रिल रोजी भाजप मध्ये प्रवेश करणार अशा चर्चा देखील केल्या जात होत्या. मात्र १२ तारखेला मोदींच्या सभेत विखे पाटील कोठेच दिसले नाहीत त्यामुळे त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा थांबल्या. मात्र शिर्डी मतदारसंघात आपल्या नावाचा उल्लेख देखील होत नाही. आपण पक्षात असताना आणि राज्याचे मोठे जबाबदरीचे पद आपल्याकडे असताना आपल्याला साध पक्षाच्या फलकांवर देखील छापले जात नाही. या बद्दल यांनी उघड खंत बोलून दाखवली होती.
माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान
दरम्यान आज सकाळी अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राधा कृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच प्रमाणे हा राजीनामा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देखील स्वीकारण्यात आला आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिन चार दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्याच प्रमाणे आता राजीनामा दिल्यानंतर आपण भाजप मध्ये प्रवेश करणार का या वृत्ताचा देखील विखे पाटलांनी इन्कार केला आहे.
पंकजा आणि सुजय यांच्यात हे संबंध, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट