आंबेडकर- शिंदे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार  प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त भेट झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिवराज पाटील चाकुरकरांना भेटायला गेलेले सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांना भेटले आहेत अशी माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी  सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर आता दोघांमध्ये झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १८ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. अशा सर्व राजकीय स्थितीत सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांना का भेटले या बद्दल राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण  आले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जय सिध्देश्वर शिवाचार्य असा तिहेरी सामना रंगणार आहे. त्यामुळे शिंदे आंबेडकर यांच्या भेटीला विशेष महत्व आहे. या भेटीतून नवीन समीकरण जन्माला येईल का हे  देखील आता पाहण्यासारखे राहणार आहे.