अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून अहमदनगर लोकसभा मतदार संघातून ते आगामी निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी कडून सुजय विखे यांच्यासाठी प्रतिस्पर्धी म्हणून विधानसभेचे अरुण जगताप किंवा प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्यास नकार दिल्यावर राष्ट्रवादी कोणता उमेदवार देते हे बघावे लागेल. राष्ट्रवादी आज बैठक घेऊन आपला लोकसभेचा उमेदवार घोषित करणार आहे. भाजपला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी दमदार उमेदवार देण्याची राष्ट्रवादीला गरज आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने,सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला.
इतर महत्वाचे –
‘या’ अटीवर मी भाजप प्रवेश करणार – कालिदास कोळंबकर