सलमान खान सोबत काम करण्याबद्दल पूजा हेगडेची प्रतिक्रिया…

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटात सुपरस्टार सलमान खानसोबत दिसणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना हि अभिनेत्री म्हणते की ती सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या सलमानबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. पूजा हेगडे हिने ट्विटद्वारे आपला उत्साह व्यक्त केला.तिने लिहिले आहे की, ‘सन 2020 ची सुरुवात खूप मोठी आहे. तुम्हां सर्वांना ही बातमी सांगत असताना मी खूपच अचंभित झाली आहे… सलमान मी तुमच्याबरोबर यावर काम करण्यासाठी थांबू शकत नाहीये’. चित्रपटात पूजा सलमान खानची नायिका म्हणून दिसणार आहे.

चित्रपटाचे निर्माता व पटकथा लेखक साजिद नाडियाडवाला म्हणाले की, ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटात पूजा हेगडे हिच्याबरोबर काम केल्यावर आम्हाला वाटले की ती या चित्रपटासाठी एकदम परिपूर्ण आहे. तिची पडद्यावरील उपस्थिती खूपच आश्वासक आहे. सलमान आणि तिची जोडी खूप चांगली दिसेल. ते कथेत ताजेपणा आणतील. “

या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास या चित्रपटात सलमान एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे पण त्याच्या लूकवर अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. चित्रपटात पूजा एका छोट्या गावातल्या मुलीची भूमिका साकारणार आहे. ‘कभी ईद कभी दिवाळी’ हा चित्रपट वर्ष 2021 मध्ये ईदवर प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद हे करणार आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here