हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे आणि महाराष्ट्रातील विविध विषयांवर खास शैलीत मत मांडणारे नितेश कराळे गुरुजी सातत्याने चर्चेत असतात. यापूर्वी 2020 साली पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढवल्यानंतर आता ते पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे त्यांची यु ट्यूब पोस्ट ..
कराळे गुरुजी यांनी आपल्या यु ट्यूब वर पोस्ट करत आपण राजकारणात यावं का? असा सवाल आपल्या चाहत्यांना केला आहे. त्यावर तब्बल २२ हजार लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे. यातील ७४ % लोकांनी हो म्हणत त्यांना राजकारणात येण्यास पाठिंबा दर्शवला आहे तर २६ % लोकांची मात्र कराळे गुरुजींनी राजकारणात पडू नये असं मत मांडलं आहे.
बऱ्याच जणांनी कराळे गुरुजींच्या या पोस्टवर जोरदार कमेंट्स केल्या आहेत. सध्या कराळे गुरुजींसारख्या लोकांची राजकारणात गरज आहे असं मत एका यूजर्सने व्यक्त केलं. तर राजकारणात शिकलेली आणि समाजाचं हिट जोपासणारी कराळे गुरुजींसारखी माणसे असायला हवी अशी कमेंट्स एका चाहत्याने केली. तर एकाने तर अपक्ष म्हणून कराळे गुरुजींनी राजकारणात यावं तरच आम्ही तुमचा आधार असू असं म्हंटल आहे.
दरम्यान, नितेश कराळे यांनी यापूर्वी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 6 हजार 889 मतं मिळाली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात यावं का? असा सवाल केला आहे. त्यामुळे कराळे गुरुजी खरंच सक्रिय राजकारणात एन्ट्री करणार का? आणि आले तर कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.