नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | नवनीत राणा भाजपच्या वाटेवर आल्याचे सध्या सर्वत्र बोलले जाते आहे. तसेच त्यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली.बदल तर होतच असतात असे वक्तव्य रवी राणा यांनी केल्याने राणा दाम्पत्यांची राजकीय भूमिका बदलणार काय असा सवाल राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे. अमरावती शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्दयांवर विचार विनिमय करण्यासाठी मी अमित शहा यांची भेट घेतली अशी नवनीत राणा यांनी अमित शहा यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. तर बदल तर होतच राहतात अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला नवनीत राणा यांचा आनंदराव अडसूळ यांनी पराभव केला. तर पाच वर्ष नवनीत राणा यांनी मतदारसंघ पिंजून काढत शिवसेनेला चांगलाच शह दिला. त्यानंतर नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अडसूळांना पराभवाची धूळ चारली. तर राणा यांचा हा विजय भाजपच्या मदती शिवाय अशक्यच होता त्यामुळे त्यांना भाजपने मदत केली आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे. म्हणूनच राणा कुटुंब भाजपच्या वाटेवर आहे असे बोलले जाते. असे झाल्यास भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे. तर राष्ट्रवादीला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

Leave a Comment