हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तब्बल 40 आमदारांच्या बंडखोरी नंतर आता शिवसेना खासदारही नाराज असून बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी लोकसभेतील 19 पैकी 12 खासदार उपस्थित आहेत. त्यामुळे राजकीय तर्क वितर्काना उधाण आले आहे.
गजानन कीर्तिकर, ओमराजे निंबाळकर, राहूल शेवाळे, धर्येशील माने, अरविंद रावत, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, प्रतापराव देशमुख हे खासदार मातोश्रीवरील बैठकीत उपस्थित आहेत. तर श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, भावना गवळी, रामदास तडस आणि हे खासदार उपस्थित नव्हते.
दरम्यान, राष्ट्रपदी पदाच्या निवडणूकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा द्यावा असा सूर शिवसेनेतील काही खासदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बंडोबांपुढे उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहायला यावं. यापूर्वीच 40 आमदारांच्या बंडखोरी मुळे शिवसेना काही प्रमाणात बॅकफूटवर गेली आहे.