हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून लोकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते देखील सुरु करता येते. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना आता इतर बँकेच्या ग्राहकांप्रमाणेच NEFT आणि RTGS ची सुविधा देखील मिळणार आहे. या सुविधेमुळे पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही पैसे ट्रान्सफर करता येतील.
यासंदर्भात Post Office कडून नुकतेच एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दळणवळण मंत्रालयाच्या देखरेखीखाली सध्या त्यांची चाचणी सुरू आहे. 31 मे 2022 पासून या सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. NEFT आणि RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर खूप सोपे आहे. देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या संख्येने लोकांची बचत खाती आहेत. या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुविधेची गरज बऱ्याच काळापासून जाणवत होती.
RTGS म्हणजे काय ??
रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) हे पैसे ट्रान्सफर करण्याची एक वेगवान प्रक्रिया आहे. याद्वारे एका बँक खात्यातून दुसर्या बँक खात्यात पटकन पैसे होतात. याद्वारे कमीत कमी 2 लाख रुपये ट्रान्सफर करता येतील.
NEFT म्हणजे काय ??
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) हे एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड आहे. ही सुविधा इंटरनेट बँकिंगद्वारे दिली जाते. NEFT द्वारे कितीही पैसे ट्रान्सफर करता येतात. यामध्ये कोणतेही लिमिट नाही. आठवड्यातील सातही दिवस ही सुविधा वापरता येणार आहे. बँकांमधील NEFT ट्रान्सझॅक्शन अर्ध्या तासात पूर्ण होतात. ई-बँकिंग आणि एम-बँकिंग चॅनेलद्वारे सुरू केलेल्या आउटवर्ड NEFT ट्रान्सझॅक्शन वर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. काउंटरवर NEFT रेमिटन्ससाठी प्रति ट्रान्सझॅक्शन कमीत कमी 1 रुपये तर जास्तीत जास्त शुल्क 15 लाख रुपये आहे. Post Office
Post Office बचत खात्यावरील NEFT /RTGS साठी लागणारे शुल्क
10,000 रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनसाठी 2.50 रुपये + GST
10,000 रुपये ते रु. 1 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनसाठी 5 रुपये + GST
1 लाखांपेक्षा जास्त आणि 2 लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सझॅक्शनसाठी 15 रुपये + GST
2 लाखांवरील ट्रान्सझॅक्शनसाठी 25 रुपये + GST
Post Office च्या स्कीम्सच्या अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/
हे पण वाचा :
HDFC Bank च्या रिकरिंग डिपॉझिट्सवर आता मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा
2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा
FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!
IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा