हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आज 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये अर्थमंत्र्यांकडून नोकरदार वर्ग, व्यवसायापासून ते गरीब-शेतकरी आणि महिलांपर्यंतच्या लोकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात, अर्थमंत्र्यांनी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमच्या (POMIS) डिपॉझिट्सची मर्यादा देखील वाढवण्याची घोषणा केली आहे.
दर महिन्याला होईल कमाई
जर आपल्या नियमित उत्पन्न हवे असेल तर Post Office मासिक इनकम स्कीमसाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. या योजनेमध्ये एकरकमी पैसे जमा करून दरमहा कमाई करता येईल. पोस्ट ऑफिसची योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित देखील राहतील.
फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडले जाईल
ही योजना 5 वर्षांची आहे, तसेच ती 5-5 वर्षांसाठी पुढे वाढवता देखील येईल. या योजनेमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला गुंतवणूक करता येईल. या योजनेअंतर्गत फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. यामध्ये सिंगल आणि जॉईंट अकाउंट उघडण्याची सुविधा देखील आहे. या योजनेत, सिंगल अकाउंटसाठीचे नवीन लिमिट 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये आणि जॉईंट अकाउंटसाठीचे नवीन लिमिट 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आले आहे. Post Office
1 वर्षापूर्वी पैसे काढता येणार नाही
मात्र यामध्ये गुंतवलेले पैसे 1 वर्षापूर्वी काढता येणार नाहीत. तसेच, जर ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर डिपॉझिट्सच्या 1 टक्के रक्कम कापून परत केली जाईल. त्याचप्रमाणे जर मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे काढले तर या योजनेचे सर्व फायदे मिळतील. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Union Budget 2023 : करदात्यांना खुशखबर!! मोदी सरकारकडून नवी कररचना जाहीर
Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग?? पहा एका Click वर
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा
Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय