नवी दिल्ली । बाजारात अनेक प्रकारच्या गुंतवणूकीच्या योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चांगला रिटर्न तर असतोच मात्र त्याबरोबरच जोखीमही तितकीच जास्त असते. मात्र , गुंतवणुकीसाठी FD सर्वात सुरक्षित मानली जाते. यामुळे कोणताही धोका पत्करत नसलेल्या लोकांचा विश्वास आजही FD वर कायम आहे.
देशातील अनेक लहान, मोठ्या, खाजगी आणि सरकारी बँका FD करण्याची सुविधा देतात. याशिवाय, पोस्ट ऑफिस म्हणजेच पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेची सुविधा देखील देते. जी लोकांना खूप आवडली आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसपैकी जास्त फायदा कुठे मिळेल?
सर्वप्रथम SBI मधील FD बद्दल बोलूया :
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गुंतवणुकीच्या आवश्यकतेनुसार 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह FD दर ऑफर करत आहे. SBI FD व्याजदर सामान्य ग्राहकांसाठी 2.9% ते 5.5% दरम्यान आहेत. या FD वर SBI ज्येष्ठ नागरिकांना 50 bps जास्त देते.
SBI मधील FD वर किती व्याजदर आहेत ते जाणून घ्या (₹ 2 कोटी पेक्षा कमी)
7 दिवस ते 45 दिवस – 2.9%
46 दिवस ते 179 दिवस – 3.9%
180 दिवस ते 210 दिवस – 4.4%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.4%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.1%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.2%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.45%
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 5.5%
पोस्ट ऑफिसची FD योजना :
दुसरीकडे, जर आपण पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबद्दल बोललो, तर ते एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी FD देतात. बँक FD प्रमाणे, गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस FD च्या कालावधीत गॅरेंटेड रिटर्न मिळवू शकतात.
पोस्ट ऑफिसमध्ये FD वर किती व्याजदर आहेत ?
1 वर्ष – 5.5%
2 वर्षे – 5.5%
3 वर्षे – 5.5%
5 वर्षे – 6.7%