जबरदस्त स्कीम!! दररोज 100 रुपयांची बचत केल्यास 5 वर्षांत मिळतील 2 लाख रुपये

0
1
post office scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसची (Post Office) रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना अल्प बचत करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे. या योजनेत दररोज फक्त 100 रुपयांची बचत करून पाच वर्षांच्या कालावधीत 2,14,097 रुपयांचा परतावा मिळवणे शक्य आहे. ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहे. आज आपण याचं योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

RD योजनेत मासिक किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. जर गुंतवणूकदार महिन्याला 3,000 रुपये जमा करत असेल, तर वार्षिक रक्कम 36,000 रुपये जमा होईल. ही रक्कम पाच वर्षांनंतर एकूण 1,80,000 रुपये मिळेल. सध्या पोस्ट ऑफिस RD योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर लागू आहे. ज्यामुळे 34,097 रुपयांचे व्याज मिळून एकूण परतावा 2,14,097 रुपये होईल.

खाते कसे उघडायचे?

पोस्ट ऑफिसमध्ये RD खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी आहे. कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून खाते उघडता येते. तसेच, पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवरूनही ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात.

महत्वाचे म्हणजे, पाच वर्षांनंतरही गुंतवणूकदारांना ही योजना सुरू ठेवता येते. मुदतवाढीच्या कालावधीत खाते उघडतानाचा व्याजदर कायम राहतो. मात्र, मुदतपूर्व बंद करण्याची गरज भासल्यास खाते तीन वर्षांनंतर बंद करता येते. दरम्यान, पोस्ट ऑफिस RD योजना अल्प उत्पन्न गटासाठी फायदेशीर आहे. या योजनेत नियमित बचत करत नोंदवणूकदार चांगला परतावा मिळू शकतात.