हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : भारतीय पोस्ट विभागाकडून नागरिकांसाठी अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये चांगल्या रिटर्न सोबतच गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित राहते. त्यामुळेच या खूप लोकप्रिय देखील आहेत. Post Office ची सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना देखील एक चांगली योजना आहे. यामध्ये, दररोज 95 रुपये जमा करून आपल्याला 14 लाख रुपयांचा फंड तयार करता येईल. 19 वर्षे ते 45 वर्षे वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला ही पॉलिसी घेता येईल.
ही एक एंडोमेंट स्कीम आहे. वेळोवेळी पैशांची गरज असलेल्यांसाठी ही योजना अतिशय योग्य आहे. यामध्ये विमाधारक जिवंत राहिला तर मनी बॅक मिळतो. म्हणजेच विमाधारकाला त्याने गुंतवलेले पैसे परत मिळतील आणि विमा संरक्षणही मिळेल. Post Office
मनी बॅकचा फायदा मिळेल
यामध्ये 10 लाख रुपयांचा सम एश्योर्ड आहे. म्हणजेच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपये जास्त बोनसची रक्कम मिळते. तसेच या पॉलिसीचा कालावधी 15 आणि 20 वर्षांचा आहे. यामध्ये 15 वर्षांच्या पॉलिसी अंतर्गत, 6, 9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर विम्याच्या रकमेच्या 20-20 टक्के रक्कम मनी-बॅक म्हणून मिळेल. तर उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह मॅच्युरिटीवर मिळेल. त्याचबरोबर 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये, 8, 12 आणि 16 वर्षांमध्ये, 20-20 टक्के रक्कम पैसे परत मिळतील आणि उर्वरित 40 टक्के मॅच्युरिटीवर बोनससह मिळेल. Post Office
अशा प्रकारे तयार करा 14 लाखांचा फंड
जर एखाद्याने 20 वर्षांसाठी वयाच्या 25 व्या वर्षी 7 लाख विमा रकमेसह ही पॉलिसी घेतली, तर त्याला दररोज 95 रुपये प्रमाणे प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच त्याला दरमहा 2850 रुपये जमा करावे लागतील. तसेच 3 महिन्यांसाठी हप्ते भरल्यास, 8,850 रुपये आणि 6 महिन्यांसाठी 17,100 रुपये भरावे लागतील. अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने मॅच्युरिटीवर सुमारे 14 लाख रुपये मिळतील. Post Office
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/rpli.aspx
हे पण वाचा :
Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ‘ही’ Electric कार; कुठे होतेय विक्री??
LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट; पहा नवे दर
शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!
Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर