हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Post Office कडून देशभरातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या आहेत. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित असल्याने या योजनांमध्ये लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. Post Office ची किसान विकास पत्र ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. अलीकडेच सरकारकडून या योजनेच्या व्याजदरात वाढही करण्यात आली आहे. ज्यामुळे आता ही योजना आधीपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. तसेच यामध्ये गुंतवलेली रक्कम फक्त 120 महिन्यांत दुप्पट देखील होईल.
मॅच्युरिटी कालावधी
हे लक्षात घ्या कि, 1 जानेवारी 2023 पासून, आता किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे 123 महिन्यांऐवजी 120 महिन्यांत दुप्पट होणार आहेत. कारण व्याजदरातील वाढीनंतर या मधील गुंतवणुकीवर 7.20 टक्के दराने व्याज मिळेल. याआधी या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 123 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के दराने व्याज दिले जात होते. मात्र आता नवीन बदलानंतर याचा मॅच्युरिटी 10 वर्षांची असेल. Post Office
किती पैसे गुंतवावे लागतील ???
Post Office च्या या योजनेत फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करता येते. यानंतर, 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल. या योजनेची खास बाब अशी कि, यामध्ये जास्तीच्या गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. तसेच या अंतर्गत सिंगल आणि जॉईंट अकाउंट उघडता येते. यासोबतच गुंतवणूकदाराला नॉमिनीची सुविधा देखील मिळते.
अशा प्रकारे उघड खाते
हे जाणून घ्या कि, 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याताही भारतीय नागरिकाला Kisan Vikas Patra मध्ये गुंतवणूक करता येईल. किसान विकास पत्रामध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते, मात्र हे खाते कोणत्याही प्रौढ व्यक्तीलाच काढावे लागेल. Post Office
सर्टिफिकेट मिळेल
या योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल. ज्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करावी लागेल. तसेच या अर्जासोबत ओळखपत्रही जोडावे लागेल. यानंतर, अर्ज आणि पैसे जमा करताच किसान विकास पत्राचे सर्टिफिकेट मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/personal-banking/investments/government-deposit-schemes/e-kisan-vikas-patra-scheme
हे पण वाचा :
PPF मधील गुंतवणूकीबाबत आले मोठे अपडेट, हे जाणून घेतल्याशिवाय गुंतवू नका पैसे
LIC Jeevan Azad : ‘या’ नवीन पॉलिसी अंतर्गत मिळतील अनेक फायदे, त्याविषयी जाणून घ्या
Budget 2023 : रेल्वे अर्थसंकल्प सामान्य बजटचा भाग बनण्याचा रंजक इतिहास जाणून घ्या
PIB Fact Check : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप, तपासा ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्यता
Shivsena-VBA Alliance: शिवसेना- वंचित युतीची घोषणा; महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय