हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि रिटर्नच्या दृष्टीने Post Office ची सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम ही एक जबरदस्त स्कीम आहे. यामधील गुंतवणुकीवर 7.4 टक्के व्याज दिले जाईल. तसेच यामध्ये दर तिमाहीत व्याज दराचा आढावा घेतला जातो. मात्र, गेल्या अनेक तिमाहीत यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या योजनेमध्ये चांगल्या रिटर्नबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना कर सवलतही दिली जाईल. चला तर मग या योजनेविषयी जाणून घेउयात… Post Office
कोणा कोणाला गुंतवणूक करता येईल ???
ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यामुळे 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना यामध्ये गुंतवणूक करता येईल. याशिवाय 55-60 वयोगटातील VRS किंवा लवकर निवृत्ती घेतलेल्या लोकांना आपल्या निवृत्तीनंतर 1 महिन्याच्या आत गुंतवणूक करता येईल. मात्र इथे हे लक्षात घ्या कि, कोविड-19 दरम्यान 2020 मध्ये निवृत्त झालेल्यांना 1-महिन्याची मर्यादा लागू होणार नाही. तसेच संरक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेल्या लोकांना वयाच्या पन्नाशीनंतरही यामध्ये गुंतवणूक करता येईल. मात्र 1 महिन्याची मर्यादा त्यांनाही लागू होते. Post Office
कमीत कमी किती गुंतवणूक करावी लागेल ???
यामध्ये 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीने हे खाते सुरू करता येते. त्याच प्रकारे 1,000 पटीत गुंतवणूक करता येते. यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. 5 वर्षांत मॅच्युर होणारी ही योजना काही औपचारिकता पूर्ण करून आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येईल. Post Office
अशा प्रकारे मिळेल टॅक्स सूट
यामधील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स कायदा 80C अंतर्गत सूट देखील मिळते. जर याद्वारे मिळणारे व्याज हे 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागेल. या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करावे लागतात. Post Office
दुप्पट व्याज कसे मिळवावे ???
या Post Office खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करता येतील. तसेच 7.4 टक्के दराने, प्रत्येक तिमाहीत 27,750 रुपये आणि एका वर्षात 1,11,000 रुपये व्याज मिळेल. मात्र जर जॉईंट अकाउंट उघडले तर यामधील गुंतवणूकीची जास्तीत जास्त मर्यादा 30 लाख रुपये होईल. यासोबतच गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून व्याज 2.2 लाख रुपये होईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज
Gold Price Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त तर चांदीच्या किंमतीत वाढ; आजचे दर पहा
Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन