हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : बहुतेक लोकं अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथे कालांतराने चांगला रिटर्न देखील देखील मिळेल आणि पैसेही सुरक्षित राहतील. जर आपल्यालाही एखाद्या जोखीम फ्री योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) आपल्यासाठी अगदी योग्य ठरेल. या सरकारी योजनेमध्ये 5.8 टक्के वार्षिक व्याजदराबरोबरच 100% सुरक्षितता देखील मिळते.
रिकरिंग डिपॉझिटमध्ये आपल्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. Post Office च्या RD स्कीममध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला खाते उघडता येईल. यामध्ये जॉईंट अकाउंट उघडण्याची सोय देखील येते. यामध्ये पालकांना आपल्या अल्पवयीन मुलाचे खाते देखील उघडू शकतो. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते.
या Post Office योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100 रुपये देऊन खाते उघडता येते. त्यामुळे ज्या व्यक्ती एका महिन्यात जास्त बचत करत नाहीत, ते यामध्ये गुंतवणूक करू शकतात. प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) जमा केलेल्या पैशांवर व्याज मोजले जाते. मग ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी चक्रवाढ व्याजासह आपल्या खात्यात जोडले जातात.
या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपल्याला भविष्यासाठी मोठा फंड कसा बनवता येईल, ते या उदाहरणावरून समजता येईल. जर आपण Post Office च्या रिकरिंग डिपॉझिट खात्यात 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षानंतर मॅच्युरिटीवर 16,28,963 रुपये मिळतील.
Post Office च्या रिकरिंग डिपॉझिट खात्यात सतत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने गुंतवणुकीचा हप्ता वेळेवर जमा केला नाही तर त्याला दंड भरावा लागतो. हा हप्ता भरण्यास उशीर झाल्यास दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल. तसेच सलग 4 हप्ते जमा न केल्यास खाते बंद केले जाईल. मात्र, हे बंद केलेले खाते 2 महिन्यांनंतर पुन्हा सुरु करता येते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजचा भाव पहा
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Nora Fatehi ची दिल्ली पोलिसांकडून 5 तास चौकशी
England Tour of Pakistan : 17 वर्षांनंतर इंग्लिश क्रिकेट संघ पाकिस्तानात, PCB ने शेअर केले फोटो
‘या’ Multibagger Stock ने फक्त 5 आठवड्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट