पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये गॅरेंटेड रिटर्न बरोबरच पैसेही सुरक्षित राहतील, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । माणूस रात्रंदिवस कष्ट करतो आणि पै अन पै जोडून भविष्यासाठी पैसे गोळा करतो. मात्र बाजारातील जोखमीमुळे सामान्य माणूस बाजारात पैसे गुंतवण्यास कचरतो. बँकांचे व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसमध्ये एक पर्याय उरतो.

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. येथे तुमचे पैसे तर सुरक्षित राहतीलच तसेच तुम्हाला इतर कोणत्याही बँकेपेक्षा जास्त रिटर्नही मिळतो. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत ज्यात तुम्ही पाच वर्षांच्या लॉक-इनसह गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला गॅरेंटेड रिटर्न मिळतो आणि तुमचे जमा केलेले पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित राहतात. एक फायदा असाही आहे की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कर सवलतीचा लाभ देखील मिळू शकतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिसमध्ये एफडी- फिक्स्ड डिपॉझिट्स – पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (TD) सारखी योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी पैसे जमा करू शकता. जर तुम्हाला चांगला रिटर्न हवा असेल तर तुम्हाला 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवावे लागतील. या योजनेत वार्षिक 6.7 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 1000 रुपयांचे खाते उघडू शकता. 100 च्या पटीत तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला 5 वर्षांच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर आयकर सवलतीचा लाभही मिळतो.

पोस्ट ऑफिस RD खाते
पाच वर्षांच्या गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD वर सध्या वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस RD स्कीममध्ये, तुम्ही किमान 100 रुपयांचे खाते उघडू शकता. मिनिमम डिपॉझिटच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिस NSC
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा लॉक-इन पिरियड किमान पाच वर्षांचा असतो. या योजनेत तुम्ही तुमचे पैसे पाच वर्षानंतरच काढू शकता. NSC मध्ये गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या या योजनेतील व्याज दर वार्षिक 6.8 टक्के आहे. या योजनेत तुम्ही किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक करू शकता, यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकिची कोणतीही मर्यादा नाही.

You might also like