नरेंद्र मोदी दहावी नापास आणि प्रज्ञा ठाकूर दहशतवादी : प्रकाश आंबेडकर

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कुडाळ प्रतिनिधी |वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कुडाळ येथे आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी येथे नरेंद्र मोदी आणि प्रज्ञा ठाकूर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहावी नापास आहेत. आणि प्रज्ञा ठाकूर हि अजमल कसाब सारखी दहशतवादी आहे असे खळबळ जनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी कुडाळ येथे केले आहे.

प्रकाश आंबेडकरांची  कुडाळ येथील आजची सभा रणरणत्या उन्हाच्या साक्षीने पार पडली आहे. प्रकाश नेते आणि  उपस्थित असणारा श्रोतु वर्ग कडक उन्हात सभेसाठी एकवटला होता. प्रकाश आंबेडकर देखील बिगर छताच्या मंचावरून रणरणत्या उन्हात उपस्थित जनसमुदायाला संबोधत होते. अशा रीतीने हि सभा कुडाळमध्ये पार पडली आहे.

 प्रज्ञा ठाकूर हि अजमल कसाब सारखी दहशतवादी आहे. आता ती भाजपची लोकसभेची उमेदवार बनली आहे. या बाबत नरेंद्र मोदी ना बोलतात, ना संघ प्रमुख मोहन भागवत बोलतात. पोलिसांकडे नसणारी अत्याधुनिक शस्त्रे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहेत कारण संघ हि दहशतवादी संघटना आहे असा घणाघात  प्रकाश आंबेडकर यांनी कुडाळ मध्ये केला आहे.