हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते पुण्यात बोलत होते.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून अजित पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?,” असा सवाल देखील आंबेडकर यांनी उपस्थित केला.
आपल्याच देशात उत्पादन होणारी लस आपल्यालाच महाग मिळते हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्हाला, सरकारला मिळणार्या १५० रुपयात मिळावी. अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.