काँग्रेसमधील नितीमत्ता संपली,दहा पिढ्या बसून खातील इतकं त्यांच्याकडे; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Congress
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म मेळावा पार पडला. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून टीका केली. “काँग्रेसची सध्याची अवस्था पाहिल्यास या पक्षामधील नीतिमत्ता संपली आहे. यांच्याकडे दहा पिढ्या बसून खातील इतकं आहे, असे आंबेडकरांनी म्हंटले.

नांदेडमध्ये धम्म मेळाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, मात्र त्यांच्याकडे मुद्दाच नाही. हे सामान्यांचं सरकार नाही. हे लुटारुंचं सरकार आहे, राहुल गांधींनी हे मांडायला शिकलं पाहिजे. हा चालणारा खेळखंडोबा काँग्रेस वाले मांडू शकत नाहीत कारण तेही यात एकेकाळी सहभागी होते. देशात खाजगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झाले आहे.

राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी महत्वाचे विधान केले. 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असे आंबेडकर म्हणाले.