‘काँग्रेस हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत’- प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी। “काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर चंद्रपूरमधील बल्लारपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

आंबेडकर पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री स्वत: घाबरलेले आहेत. त्यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे भाकीत केलं होत. पण यावेळी आम्ही सत्तेत बसू आणि भाजप हा विरोधी पक्ष म्हणून काम करेल” असा घणाघातही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

त्याचबरोबर आंबेडकर बँकांच्या घोटाळ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले की, “बँका कोणी चोरल्या, कोणी लुटल्या असा प्रश्न त्यांनी उपस्थिती लोकांना विचारला. त्यावेळी अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. यानंतर आंबेडकरांनी ते कोणत्या राज्याचे आहेत असे विचारले असता, गुजरात असे उपस्थिती लोकांनी उत्तर दिले. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लुटणारे हे सर्व गुजराती आहे आणि हे राज्यही गुजराती चालवत आहे. मग जर तुम्हाला तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित हवे असतील, तर भाजपला सत्तेवरुन घालवा” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्या सभा संपल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल. या आवाहनानंतर जनतेने दानपेटीत आर्थिक मदत केली.

इतर काही बातम्या-