हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पहायला मिळत आहे. शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयात्यामुळे अगोदरच अशातच ठाकरे गटाला धक्का बसला असताना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामागचे कारण म्हणजे खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केले आहे. शिवसेनेचं काँग्रेस आघाडीसोबत मनोमिलन राहिल्यास आम्ही पुन्हा एकटे लढू, असे आंबेडकरांनी म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेनेचं काँग्रेस आघाडीसोबत मनोमिलन राहिल्यास? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांना केला. यावर आंबेडकरांनी ठाकरेंचे काँग्रेस आघाडीसोबत मनोमिलन राहिल्यास आम्ही पुन्हा एकटे लढू असे म्हंटले. ठाकरे गटाचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनोमिलन राहिल्यास आपण पुन्हा एकटे लढू,अशा इशारा आंबेडकर ठाकरेंना यांनी दिला आहे.
सध्या कसबा, चिंचवड पोटनिवडणुक एकत्रित लढण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे ता दोघांनी काही दिवसापूर्वी घेतला. त्याच्या या निर्णयानंतर आंबेडकरानी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन पक्षांनी आंबेडकरांना पाठिंबा देण्याची विनंती केली नाही. त्यामुळे आंबेडकरांनी ठाकरेंना त्या दोघांची भूमिका स्पष्ट करावी नाही तर आम्ही एकटे वाटचाल करायला मोकळे, असे सांगितले.