नांदेड प्रतिनिधी | बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथील सभेत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तुमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद नक्की काय आहे ते पहिल्यांदा सांगा. आम्ही तुमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालायला तयार आहोत’ असे म्हणून आंबेडकर यांनी आर.एस.एस. ला आव्हान दिले. हिम्मत असेल तर आमचं चेलेंज स्वीकारा असा टोलाही यावेळी आंबेडकर यांनी लगावला.
‘तुमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद नक्की काय आहे ते पहिल्यांदा सांगा. आम्ही तुमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालायला तयार आहोत. वेळ तुम्ही ठरवा, ठिकाण तुम्ही ठरवा, आम्ही तिथ हजार राहू’ असं म्हणून आंबेडकर यांनी आर.एस.एस. ला आव्हान दिले. ‘एकदा आम्हाला ऐकायचंय कि तुमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद काय आहे? कुठल्या विचारसरणीचे तुम्ही पुरस्कर्ते आहात? असं म्हणून आंबेडकरांनी आपल्या भाषणातून उजव्या विचारसरणीवर ताशेरे ओढले. ‘आव्हान असेल, हिम्मत असेल तर आर.एस.एस. ने आमचं हे चेलेंज स्वीकारावं’ असंही आंबेडकर म्हणाले.
‘जगात आज पर्यंत सांस्कृतिक राष्ट्रवादावर कोणतेच राष्ट्र उभे राहिलेले नाही. जी राष्ट्र उभी राहिलेली आहेत ती भौगोलिक आणि इतिहासावर उभी राहिलेली आहेत’. असे म्हणून आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. ‘देशात सध्या दोन प्रशासन आहेत. एक राष्ट्रपती चालवतो आणि दुसरे मोहन भागवत चालवतात’ डोंबिवलीतील कुलकर्णीच्या घरावर पोलिसांनी ज्याप्रकारे रेड टाकली तशीच रेड नागपूरच्या रेशिमबागेवर टाकली तर एके ४७ आणि तलवारी सापडल्याशिवाय राहणार नाही’ असं आंबेडकर म्हणाले.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
तर सरकारी कार्यालयांमधेही भरणार संघाच्या शाखा
तुम्ही हे सरकार खाली का नाही खेचत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा RSS ला सवाल
फडणवीस यांची संघ मुख्यालयात गोपनीय बैठक !