सातारा प्रतिनिधी | ‘साताऱ्याची गादी पुरोगामी आहे मात्र सध्या त्या गादीवर प्रतिगामी बसले आहेत. पाणी बरंच गढुळ झालं आहे आता ते फेकुण द्यावं लागणार आहे’ असं म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकर बोलत होते.
सातारच्या गादीचा मान खा. उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वी कोरेगाव भिमा प्रकरणात नाव असलेल्या संभाजी भिडे यांची खा. भोसले यांनी पाठराखण केली होती. यापार्श्वभुमीवर आंबेडकरांनी उदयनराजेंवर टिका केली. ‘आपण भिडे गुरूजींवर आरोप केल्यानंतर उदयनराजे भिडेंच्या बाजूने उभे राहिले होते. तसेच उदयनराजेंनी वेळोवेळी अॅट्रॉसीटी कायद्याला विरोध केला आहे. हे योग्य आहे का ? असा सवाल आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
उदयनराजेंच्या निवासस्थानाजवळ झालेल्या या सभेत आंबेडकर उदयनराजेंबद्दल बोलणार, हे अपेक्षित होते. भाषण संपत आले असताना सातारा गादीसंदर्भात त्यांनी उदयनराजेवर हल्लाबोल केला.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले
उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट