“जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली; प्रकाश आंबेडकरांकडून ट्विट करत पुरावे सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात आहे. या दरम्यान ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजा यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी एक ट्वीट असून ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, असे म्हंटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. “जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे,”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज, म.फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.

Leave a Comment