आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

2
88
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही तुमचे सालगडी म्हणून राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांवरही टीकास्त्र सोडले.

महाराष्ट्रात घराणेशाहीचे राजकारण एकवटले असून १६९ कुटुंबे राज्यावर राज्य करत आहेत. सत्ताकेंद्रित राजकारणाने सुरुवातीला आपल्या जातीपुरती सत्ता मर्यादित करून ठेवली. त्यानंतर ही सत्ता आपल्या कुटुंबाची कशी राहील हे पाहिले, असा आरोप आंबेडकर यांनी केला. राजकीय पक्षांचा आधार जात-धर्म होता कामा नये असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला होता, हेही यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्यातील उमेदवार जाहीर करण्यात आले . औरंगाबाद-बी.जी.कोळसे पाटील (निवृत्त न्यायमूर्ती),बीड- प्रा. विष्णू जाधव, नांदेड- प्रा. यशपाल भिंगे, उस्मानाबाद- अर्जुन सलगर, जालना- डॉ. शरदचंद्र वानखेड यांना उमेदवारी देण्यात येणार आहे . तसेच परभणी आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार येत्या २३ फेब्रुवारीला जाहीर केले जातील असे आंबेडकर यांनी सांगितले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

राज ठाकरे आघाडीत राहतील, छगन भुजबळ यांचे संकेत

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

व्हॅलेंटाइन डे सप्ताहाची आज पासून सुरवात, जाणुन घ्या प्रत्येक डे विषयी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here