बस ड्रायव्हरच्या मुलीला ऑलिम्पिकचे तिकीट, भारतासाठी मेडल जिंकण्याचे आहे स्वप्न

pranati nayak
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूरच्या पिंगलामध्ये राहणाऱ्या प्रणती नायक हिला टोकयो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. प्रणती भारताची या स्पर्धेत सहभाग होणारी एकमेव महिला जिमनॅस्ट आहे. प्रणतीने उलानबटारमध्ये आयोजित 2019 आशियाई स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. नवीनतम आशियाई चॅम्पियनशीप कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली होती. यामुळे 2019 चॅम्पियनशीपच्या आधारावर टोकयो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना कोटा देण्यात आला होता. यामध्ये प्रणती नायकने आशियाई उपखंडाचा कोटा मिळवला.

प्रणतीचा जन्म 6 एप्रिल 1995 साली झाला होता. प्रणतीने एनसडबल्यू स्कूल ऑफ लॅन्गवेजमध्ये शिक्षण घेतले आहे. तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकले आहेत. सध्या प्रणती टोकयो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेल प्राधिकरण कॉम्प्लेक्स कोलकातामध्ये सराव करत आहे. सध्या ती कोरोनापासून बचाव करण्यासाठी ती बायो-बबलमध्ये आहे. प्रणतीला बाहेरच्या लोकांना भेटण्याची परवानगी नाही आहे. प्रणतीला पदक मिळेल असा विश्वास प्रणतीचे प्रशिक्षक लेखन शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

प्रणतीचे वडील श्रीमंत नायक बस ड्रायव्हर आहेत, तर आई प्रतिमा गृहिणी आहे. प्रणती त्यांची सगळ्यात लहान मुलगी आहे. लहानपणापासूनच प्रणतीला खेळात उर्जा आहे. छोटी असतानाही ही इकडे-तिकडे उड्या मारायची असे तिच्या आईने सांगितले. यानंतर प्रणतीने अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. प्रणतीचा प्रशिक्षक असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे तिचे प्रशिक्षक लेखन शर्मा यांनी सांगितले आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे प्रणतीचे स्वप्न आहे. ‘लोकांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी खूप आभारी आहे. देशासाठी पदक जिंकण्यासाठी मी कठोर मेहनत करत आहे,’ अशी प्रणती म्हणाली आहे. प्रणती पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. महिला ऑल-राऊंड इव्हेंटमध्ये ती खेळणार आहे.