हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका केली आहे. योगी यांची जागा राजकारणात नसून मठात आहे. सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजप सरकारचा समाचार घेत कृषी कायद्यासह अन्य मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले.
योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं स्थान आहे मंदिरामध्ये आणि मठात राजकारणात नाही. ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरु होतं,” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.
त्या पुढे म्हणाल्या, उत्तर प्रदेशची निवडणूक आल्यामुळेच तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यात आले, याचा पुनरुच्चार करत, वर्षभर शेतकऱ्यांनी लढा दिला, ७०० शेतकऱ्यांचा बळी तुम्ही घेतला आणि मग कायदे रद्द केले, याबद्दल लाज वाटायला हवी, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.